चावडी वरच्या गप्पा
गण्या - काय रे मन्या, काय चाललंय तुझं ?
मन्या - का रं बुवा काय झालं ?
गण्या - आरं, कधी कागदं काय टराटरा फाडतो, सरपंचाच्या नावाने बोंबा काय मारतो?
मन्या - मन्या, मग काय करावं मी? यांना एक निर्णय घेत येत नाही.
गण्या - मन्या, तू काय सवताला राहूल गांधी समजतो की काय?
मन्या - आता राहूल बाबाचा आणि माझा काय सबंध? उगा वडाचे पण पिंपळाला लावू नगस.
मन्या - नसे नाही रे बाबा. त्या बाबाने कुठला तरी कागद टराटरा फाडला आणि
गल्ली पासून दिल्लीपर्यन्त सारे नेते घाबरले. पीएम शाहेबानी पण निर्णय
बदलला.
मन्या - तुला म्हणायचंय काय? कोड्यात बोलू नगस.
गण्या - अरं, बाबा गावकीच्या इरोधात जावू नकोस.
मन्या - का?
गण्या- अरं, तो सरपंच म्हणजे अक्षी अजित दादा सारखा आहे.
मन्या - आता दादा चा हिथं काय संबंध?
गण्या - दादा नाही का बोल्ला, पाठींबा काढून घेईन म्हणून?
मन्या - मग काय हूईल?
गण्या - अरं, तेच्या बिगर तू गावकी चालवू शकशील का?
तुझे मेम्बर किती?
मन्या - मी काय त्याला घाबरतो व्हंय?
गण्या - तसं न्हाय रं ?
मन्या - अरं, मला बी आमदार साहेबाचा पाठींबा हाय. समजतोस काय?
गण्या - तू लई कच्चा हाय.
मन्या - गण्या, लई जास्त बोलू नगस.
गण्या - नाही रं बाबा, तू गुमान शी एम साहेबाचा धडा घे.
मन्या - आता त्यांचे काय?
गण्या - त्यानाबी लई गुरुर, दिल्लीवाले पाठीशी हाय.
मन्या - मग काय झाले?
गण्या - व्हणार काय, पवाराबिगर त्यांचेही पण हलत नाही.
मन्या - तू म्हणतोस त्यात दम हाय गड्या.
गण्या - आता कसे डोस्कं टाळ्यावर आलं.
मन्या - election होवून दे, नंतर बघतो त्या सरपंचाला.